Thursday, April 4, 2019

History and Politics

इतिहास आणि राजकारण


आज अचानक  लिहिण्याचे कारण म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आणि त्यावर केलेला विचार. काही गोष्टी आधीच क्लिअर करू इच्छितो. ते म्हणजे माझं ह्या सगळ्या विषयांमधील ज्ञान, सत्याची केलेली पडताळणी आणि माझी बुद्धिमत्ता ह्याचा एकंदरीत विचार करता, पुढील लिखाण कसे घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मी कुठल्याही गोष्टीला पुरावे सादर करण्यास जबाबदार नाही. मी आधीच कबूल करतो कि बऱ्याच गोष्टी मला माहित नाही आहेत.


परवा tashkent files ह्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला. त्यातला एक संवाद खूप आवडला "हा देश गांधींचा आहे, नेहरूंचा आहे.". "हा देश शास्त्रींचा का नाही." खरंच किती समर्पक प्रश्न आहे. हा देश स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, लोकमान्य टिळक आणि अश्या अनेक महान लोकांचा देश का नाही? थोडा विचार केला तर लक्षात येतं कि लहानपणापासून आपल्या मनावर ह्या गोष्टी बिंबवल्या गेल्या आहेत. आणि हेतुपुरस्सर आणि षडयंत्र रचून केल्या गेलेल्या ह्या गोष्टी आहेत. काही महान लोकांचा ज्वलंत इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये १ परिच्छेद किंवा जास्तीत जास्त १ धडा, ह्या पलीकडे जाऊ दिला नाही. उद्याने, पूल, योजना ह्यांच्या नावांच्या माध्यमातून इतर काही लोकांचा इतिहास वारंवार आपल्या समोर आणला गेला. इतिहास घडवण्यात अनेक लोकांचा सहभाग होता पण फक्त ह्या २-३ लोकांचा एवढा उदो उदो का केला गेला?


आपला देश “एक” असण्यामागे एक च व्यक्ती कारणीभूत आहे ते म्हणजे सरदार पटेल.
जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर संस्थाने भारतात विलीन करताना लोहपुरुष पटेल यांनी साम, दाम, दंड, भेद नीती वापरून केलेलं काम भारतवर्ष कधीही विसरू शकत नाही, विसरू नये. सरदार पटेल ह्यांचा काम जर इतिहासातून वजा केलं तर कदाचित भारत देशही युरोपातील देशांसारखा अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला असता.
सर्वांनी आवर्जुन बघावा असा सिनेमा - SARDAR Vallabhbhai Patel FULL HD MOVIE
https://youtu.be/qPliOfznh_0
अशा महान व्यक्तीला आता उत्तुंग मूर्ती बनवून दिलेली श्रद्धांजली हि स्तुत्य आहे. आणि अशी गोष्ट होणे गरजेचेच होते.


भारत हा स्वतंत्र झाला तो अहींसे मुळे कि सुभाषचंद्र बोस ह्यांचा Indian National Army मुळे. अजित डोवल, Ajit Doval, National Security Advisor ह्यांनी ह्या प्रश्नाचे एका मुलाखतीमध्ये दिलेले उत्तर ऐकण्यासारखे आहे. इंग्रजांची सगळ्यात मोठी ताकद होती भारतीय आर्मी आणि त्यातील सैनिक. त्यांचा वापर करून त्यांनी भारतीयांवर राज्य केले होते. आणि अशा ठिकाणीच हात घातला होता बोसबाबूंनी. आता आपलं काही खरं नाही म्हणून इंग्रजांनी काढता पाय घेतला होता. ह्या Indian National Army मधील सैनिकांना २०१९ प्रजासत्ताक दिन परेड मध्ये दिला गेलेला सन्मान उचितच नाही का? सुभाषचंद्र बोस सारख्या व्यक्ती बद्दल माहिती देणारे, लाल किल्ला येथे बनवलेले Kranti Mandir Netaji Subhas Chandra Bose Museum Red Fort हि भारताने दिलेली well-deserved श्रद्धांजली च आहे, नाही का?


भारताचे पंतप्रधान मोदी यांची अंदमान भेट. तेथील बेटांना दिलेली नवीन नावं- शहीद द्वीप, स्वराज्य द्वीप आणि नेताजी सुभाष चंद्र बोस बेट. आणि अंदमान भेटी मध्ये तेथील कारागृहातील त्या खोलीत स्वातंत्रवीर सावरकर यांना दिलेली श्रद्धांजली.
वर नमूद केलेल्या ह्या सगळ्या गोष्टींवरून हे मात्र नक्की सांगता येतंय कि काही गोष्टी हळू हळू बदलायला सुरुवात झाली आहे. Well-deserved लोकांचा सत्कार केला जात आहे,त्यांना मान मिळत आहे. ह्या वर्षी झालेले पद्म पुरस्कार हि तुम्ही बघू शकता. बदल दिसण्यासारखा आहे.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाली. आता इंटरनेट, सोशल मीडिया घराघरात पोचलं. आता लोकांना आपले विचार जे प्रवाहाच्या विरोधात असले तरीही झटक्यात मांडता येतात आणि तितक्याच झपाट्याने ते पसरतात. ह्याचा फायदा आपण घेणार का?
खरा इतिहास आपल्याला ७० वर्ष उपलब्ध असेल सुद्धा पण तो आपण सगळ्यांनी शोधला नाही, वाचला नाही, ह्यात आपली चूकच झाली. आता आपण ती चूक सुधारणार का? आपल्या पुढच्या पिढीला योग्य इतिहास आपण शिकवणार का?
हा योग्य दिशेने होणारा बदल आपण रोखणार? कि ह्याचं समर्थन करणार?


~ सुयश अभ्यंकर
४ एप्रिल २०१९

No comments:

Post a Comment

History and Politics

इतिहास आणि राजकारण आज अचानक  लिहिण्याचे कारण म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आणि त्यावर केलेला विचार. काही ग...