आनंदवन, हेमलकसा
सोमनाथ
अभ्याससहल
हाथ लगे निर्माण मे। नाहीं मांगने, नाहीं मारने।
~बाबा आमटे
~बाबा आमटे
बाबा
आमटे आणि त्यांच्या कुटुंबाचं
काम ऐकिवात सगळ्यांनाच असतं. पण ते प्रत्यक्षात
बघण्याची इच्छा होती. आणि त्याच सुमारास
समजलं की -
ओपश
सोशियो-कमर्शिअलस् प्रा. लि या सामाजिक
क्षेत्रामधे कार्यरत असणाऱ्या कंपनीतर्फे "सामाजिक प्रकल्पांना भेट" या उपक्रमाअंतर्गत *"आनंदवन, हेमलकसा
सोमनाथ"* या बाबा आमटे
यांच्या सामाजिक प्रकल्पांना भेट देणारी अभ्याससहल
आयोजित करण्यात आली आहे .
मी,
माझे आई बाबा आणि
लिमये काका काकू अशा
५ जणांचं नाव रजिस्टर केलं.
सुरुवातील जे पैसे भरले त्या नंतर शेवटपर्यंत कुठलेही hidden charges ओपश ने घेतले नाहीत. आनंदवन येथे पर्सनल खरेदी केली तेवढाच काय तो खर्च करावा लागला.
सहलीच्या
थोडे दिवस आधी एक
प्रि टूर सेशन ठेवण्यात
आला होता. ह्या सेशन मधे
पुढील गोष्टी थोडक्यात सांगण्यात आल्या -
आपण
ह्या टूर ला का
जात आहोत, तिकडे कोणत्या गोष्टी बघायला मिळतील, आपली अपेक्षा काय
असावी, तिकडे काय करावं आणि
काय करू नये. सगळ्यांबरोबर
ओळखही झाली.
टूर
च्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता पुणे स्टेशन ला
भेटलो. तिकडे टूर मॅनेजर पल्लवी
कविता बरोबर ओपश टीम मधील
इतर काही लोकं सुद्धा
आली होती. सगळ्यांना तिकिटे देण्यात आली. आमचा प्रवास
सुरु झाला. AC ३ tier ची तिकिटे बुक
करण्यात आली होती.
ओपश
तर्फे सगळ्यांसाठी जेवण arrange करण्यात आले होते. छान
पॅकिंग असल्यामुळे ट्रेन मध्ये असूनही खाताना त्रास झाला नाही. अधून
मधून snacks देतच होते. ह्या
पूर्ण सहलीमध्ये खाण्याच्या बाबतीत आमचे खूप लाड
करण्यात आले. नाश्ता, चहा,
अधून मधून सुका खाऊ
आणि जेवण सगळं वेळच्या
वेळी आणि चविष्ट आणि
पुरेसं असं होतं.
दुसऱ्या
दिवशी वर्धा स्टेशन ला उतरलो. तिकडून
पुढील प्रवासासाठी एक बस तयार
होती. तिकडून आम्ही आनंदवन ला पोचलो.
लोटी
रमण गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची
व्यवस्था होती. एका रूम मध्ये
४ लोकं अशा प्रकारे
विभागणी होती. प्रत्येक रूम ला अटॅच
बाथरूम होते.
त्या
नंतर थोडं फ्रेश होऊन
आम्ही बस ने श्रद्धेय
बाबा आमटे आणि साधनाताई
आमटे यांच्या समाधी
(श्रद्धावन)
ला भेट दिली. सर्व
परिसर हिरवागार होता.
तिकडचा
एक तरुण कार्यकर्ता आमच्या
बरोबर होता. आम्हाला माहिती देत होता.
नंतर
आम्ही मध्यवर्ती भोजनालय बघायला गेलो. आनंदवन येथे प्रत्येक घरी
स्वयंपाकघर नाही. सगळ्यांचं जेवण इकडे बनवलं
जात. शेतात आणि इतर ठिकाणी
काम करणाऱ्या लोकांना डब्बे पोचवले जातात. आणि अशा प्रकारे
एकोपा जोपासला जातो. ह्या स्वयंपाकघरात सौरऊर्जा
प्रकल्प ही आहे.
त्या
नंतर जेवणाची वेळ झाली जेवणाची
वेळ झाली होती. आम्ही
अतिथी भोजनालयाकडे निघालो. सगळे पदार्थ स्वादिष्ट.
वाढायला इकडचे कार्यकर्ते होते. इकडे फार मनुष्यबळ
नाही. जेवण झाल्यावर प्रत्येकाने
आपापले ताट घासून ठेवायचे
असते.
थोडी
विश्रांती घेऊन आम्ही आनंदवन
येथील कार्याची माहिती घेण्यासाठी 'गोकुळ' येथे गेलो.
तिथे
आधी एक विडिओ दाखवण्यात
आला. नंतर तेथील कार्यकर्त्यांनी
आमच्याशी संवाद साधला. त्यांनतर प्रभू सर यांच्याबरोबर
आनंदवन मध्ये फेरफटका मारावयास निघालो.
तेथील
हॉस्पिटल, अपंगांची कार्यशाळा, प्रिंटिंग प्रेस, बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्र असे विविध विभाग
आम्ही बघत बघत पुढे
जात होतो.
सगळे
कार्यकर्ते आपापल्या कामात मग्न झाले होते.
काही लोकं ग्रीटिंग कार्ड
बनवत होते, काही काष्ठ शिल्प.
अंध व्यक्ती सतरंजी विणत होत्या. काही ठिकाणी जुन्या टायर पासून चपला बनवल्या जात होत्या.
हाताने अपंग असल्याने पायाने ग्रीटिंग कार्ड बनवणाऱ्या शकुंतला ला बघून सगळे मंत्रमुग्ध
झाले.
फिरून
झाल्यावर संध्याकाळी चहापान झाल्यावर प्रदर्शन आणि विक्री केंद्रावर
बऱ्याच लोकांनी खरेदी केली. आमटे कुटुंबाला मिळालेले
सर्व पुरस्कार येथे बघायला मिळतात.
दुसऱ्या
दिवशी सकाळी हेमलकसा साठी निघालो. वाटेत
अत्यंत चविष्ठ नाष्टा केला.
लोक बिरादरी प्रकल्पाला
पोचलो.
हेमलकसा
येथील डॉ प्रकाश आमटे
यांच्या कार्याबद्दलची एक विडिओ क्लिप
दाखवली आणि स्वयंसेवकाने आमच्याशी
संवाद साधला. प्राण्यांच्या अनाथालयाची सैरही घडवली. हे झू नसून
अनाथालय आहे हे सुद्धा
समजलं.
ह्या सगळ्यानंतर प्रकाश
सरांना आणि मंदाकिनी मॅडम
यांना भेटायची इच्छा होत होती. आणि
थोड्याच वेळात आमची ती इच्छा
पूर्ण झाली. अत्यंत साधी राहणी आणि
उच्च विचारसरणी. त्यांनी घातलेल्या चपला आनंदवन येथे
रबरी टायर पासून चपला
बनवण्याच्या कार्यशाळेत बनवलेल्या होत्या. ओपश टीम ला
या ग्रेट व्यक्तिमत्त्वांना भेटायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
त्या
नंतर आम्ही लगेचच सोमनाथ येथे जाण्यासाठी निघालो.
सोमनाथ म्हणजे आनंदवन येथील लोकांचे पुनरुज्जीवन करून डॉ विकास
आमटे यांनी वसवलेलं निसर्गरम्य गाव, आणि हे साध्य झालंय लोकांच्या श्रमदानामुळे . इकडे नानाविध
प्रयोग करून शेती केली
जाते. शेततळी
बांधली जातात, श्रमदान केले जाते. टायर
पासून बांधलेला बंधारा सुद्धा येथे बघायला मिळतो.
सोमनाथ येथे दर वर्षी श्रमदान शिबीर घेण्यात येते ते म्हणजे "श्रम संस्कार छावणी". बाबा आमटे म्हणत श्रम संस्कार छावणी म्हणजे तरुणांना संवेदनशील, जबाबदार, विकासात्मक नागरिकांमध्ये रूपांतरित करण्याचा कारखाना!
काही
गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे आनंदवन, हेमलकसा सोमनाथ या तीनही ठिकाणी
सगळे लोकं प्रसन्न होते.
जे काम करतोय ते
त्यांना आवडत होतं , कोणीही तक्रार
करत नव्हते. श्रम ही है
श्रीराम हमारा हे ब्रीदवाक्य मनापासून
पळत होतें.
आम्ही ठरवलेली ठिकाणे पाहून झाली होती पण थोडा वेळ शिल्लक होता. सेवाग्राम हे ओपश च्या पॅकेज मधे मात्र नव्हते तरीही ओपश च्या मित्रांनी आम्हाला सेवाग्राम आश्रमाचे दर्शन घडवले.
तो पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा वर्धा स्थानकात पोचलो. परतीचा प्रवास सुरु झाला. आमची
अभ्यास सहल संपली खरी
पण येथील कार्याने सगळेच भारावून गेलो होतो. नवीन
ओळखी झाल्या होत्या. ओपश कार्यकर्त्यांचे मनापासून
आभार. काही गोष्टींचा मनापासून
उल्लेख केला पाहिजे. आपल्या
कुटुंबातील एक असल्याप्रमाणे कविता
आणि पल्लवी आपली काळजी घेतात.
हवं नको ते बघतात.
बरेच वयोवृद्ध लोक आमच्या ट्रिप
ला आले होते. सगळ्यांनी
तेवढंच एन्जॉय केलं. सगळं मॅनेजमेंट परफेक्ट
होतं.
लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी ह्या मुख्य उद्दिष्टाने जरी ओपश टूर अरेंज करत असते तरीही सगळ्या गोष्टी एकदम professionally मॅनेज केल्या जातात हे कौतुकास्पद. ओपश ला धन्यवाद
आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
टूर झाल्यानंतर काही दिवसांनी post tour session घेण्यात आला. सगळ्यांशी पुन्हा भेटी झाल्या. आमच्या ग्रुप पैकी बरेच जण हे ट्रिप नंतरही ओपश च्या अनेक इतर सामाजिक कार्यात कार्यरत आहेत.
~सुयश अभ्यंकर~
https://www.facebook.com/opashsociocommercials/videos/683998791799732/
Opash Socio-Commercials Pvt. Ltdhttp://opash.co.in/info@opash.co.in📞 अधिक माहितीसाठी संपर्क -*९८८१२३३३७४*, *०२०-२५४६११४४*
No comments:
Post a Comment