Thursday, March 21, 2019

डलहौसी, धर्मशाळा आणि अमृतसर ट्रिप

डलहौसी, धर्मशाळा आणि अमृतसर ट्रिप


मी ह्या आधी २ वेळा हिमाचल प्रदेश ला जाऊन आलो आहे आणि तिकडच्या पर्वतरांगा नद्या ह्यांच्या प्रेमात पडलो आहे. त्यामुळे डलहौसी, धर्मशाळा आणि अमृतसर ट्रिप करायचे ठरवले. ह्या वेळी स्वतः प्लांनिंग न करता वीणा world तर्फे जायचे ठरवले. सुट्ट्यांच्या तारखा आणि ग्रुप टूर च्या तारखा ह्या वेगळ्या असल्यामुळे customized टूर बुक केली. विमान तिकिटे स्वतः वेगळी बुक केली. आमची १ मार्च २०१९ ला रात्री ची flight होती.
पुण्याहून रात्री ११.३० ला निघून दिल्ली ला स्टॉप घेऊन सकाळी ६ ला अमृतसर ला पोचलो. आमचा ड्राइवर पंकज एअरपोर्ट वर आला होता. तिकडून डलहौसी ला जायचा प्रवास सुरु झाला. ५-६ तासाचा हा प्रवास होता. पठाणकोट मार्गे पंजाब सोडून हिमाचल मध्ये प्रवेश केला. वाटेत एके ठिकाणी नाष्टा केला आणि तेव्हाच उत्तर भारतीय सुंदर पदार्थांना सुरुवात झाली.
एकदम सॉफ्ट पनीर पकोडे, कांदा बटाटा पराठे, लोणचं आणि सोबत चहा असा छान नाश्ता झाला. जसे जसे डलहौसी जवळ येत गेले तसे आजूबाजूला snow दिसायला सुरुवात झाली. मार्च महिना असल्याने खूप snow असेल असं वाटलं नव्हतं पण ह्या वर्षी मार्च मध्ये सुद्धा हिमवर्षाव झाला. माऊंट व्यू हॉटेल ला पोचलो. अगदी डलहौसी बसस्टॅण्ड च्या चौकामध्येच हॉटेल आहे. सुंदर आणि प्रशस्थ रूम मिळाली होती.
संध्याकाळी डलहौसी च्या मॉल रोड ला गेलो. साधारण ३ किलोमीटर अंतर असेल पण पूर्ण चढ आणि वळ्णावळणाचे रस्ते त्यामुळे अंतर जास्त वाटते. तिकडे एका छानशा दिसणाऱ्या कॅफे मध्ये गरमा गरम टोमॅटो सूप घेतले. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आणि भ्रमनिरास झाला. सीझन नसल्यामुळे अनेक दुकाने बंद होती. परतीचा रस्ता संपता संपत नव्हता. कपडे आणि बूटही ओले झाले. आम्ही एखादे जॅकेट आणि थर्मल घेऊन गेलो होतो. पण इकडची थंडी बघून कानटोपी आणि मोजे गरजेचे आहेत हे कळाले. हॉटेल च्या समोरच चौकात एक छान दुकान होते. दुसऱ्या दिवशीसाठी snow मध्ये चालणारे बूट सुद्धा भाड्याने घेतले.
परत रूम वर आलो तेवढ्यात ड्राइवर ने फोन करून सांगितलं कि बाहेर snowfall होत आहे. लगेच बाहेर आलो. सुंदर snowfall अनुभवता आला.



दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रूम बाहेर आलो आणि हॉटेल मधून सुंदर नजारा दिसत होता. आदल्या दिवशी धुके आणि अंधार ह्या मुळे मागे काय आहे ह्याची जाणीवही झाली नव्हती.
त्या नंतर sightseeing साठी निघालो. पंचपुला येथे गेलो. थोड्या पायऱ्या चढून सुंदर स्पॉट होता. एका स्वातंत्र्यसेनानी चा पुतळाही येथे बघायला मिळतो.
नंतर snow पॉईंट ला गेलो. एवढं snow आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग बघून मंत्रमुग्ध झालो.
बर्फात खूप खेळलो. स्नो मध्ये चालणे वाटते तितके सोपे नसते हे कळले. तिथे गरमा गरम मॅगी आणि चहा घेतला. त्या नंतर मुख्य गांधी चौकात असलेले एक चर्च आणि तिबेटी मार्केट मध्ये चक्कर मारली. खूप हिमवर्षाव आणि landslide मुळे रस्ते बंद असल्या कारणाने आम्हाला खज्जियार आणि चमेरा तलाव अशा २ ठिकाणी जाता आले नाही.

दुसऱ्या दिवशी धर्मशाळा साठी निघालो. धर्मशाळा शहर खाली असून तिथून ३-४ किमी वरच्या बाजूला मॅक्लॉडगंज हे गाव आहे. तिथे प्राईड सूर्या हॉटेल मध्ये पोचलो. चेकइन करून थोड्या वेळात जेवणासाठी चालत च निघालो. अशोका ह्या ३ मजली हॉटेल मध्ये गच्ची वर बसून जेवण केले.
नंतर दलाई लामा मंदिराकडे निघालो १५ मिनिटे चालून तेथे पोचलो. हे मंदिर खूप भव्यदिव्य नाही. कुठे जायचे आहे काय बघायचे आहे हे सांगायला तेथे कोणी नसते. बॊध्द भिक्खू आपल्या प्रार्थना म्हणण्यात मग्न असतात.


त्या नंतर मॅक्लॉडगंज मार्केट मध्ये चक्कर मारली. फार मोठे मार्केट असेल अशी अपेक्षा होती पण तसे काही नव्हते. २ रस्ते साधारण ५०० मीटर लांबीचे आणि मार्केट संपतं. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मशाळा sightseeing ला निघालो. सकाळी भागसु नाग मंदिर आणि धबधबा बघायला निघालो. शंकराचे सुंदर मंदिर आहे. बाजूला छोटा तलाव आहे.


तिथून पुढे साधारण अर्धा तास चालत पुढे गेलो कि धबधबा दिसतो. सुंदर फेसाळते पाणी बघून मन प्रसन्न होते. नंतर St. John in the Wilderness चर्च ला भेट दिली. नाव वाचून अंदाज बांधला होता तसे उंच झाडांनी वेढलेले पुरातन चर्च आहे.
तिथून पुढे दल लेक च्या दिशेने निघालो.
तिथूनच पुढे नड्डी व्यू पॉईंट होता. तिथे डोंगराला वळसा घालणारा रस्ता होता. गाडीतून उतरून चालत निघालो. सुंदर व्यू दिसत होता.



साधारण १ किलोमीटर आत आलो आणि पावसाळा सुरुवात झाली. आणि तापमान ० च्या आसपास असल्याने पाण्याचे गारांमध्ये रूपांतर होत होते. जवळ एक म्हातारे काका चहा-मॅगी ची टपरी चालवत होते. त्या ठिकाणी खाल्लेली मॅगी आणि गरमागरम चहा कायम लक्षात राहील. थोडे जास्तीचे पैसे दिल्यानंतर त्यांना झालेला आनंदाचं काही मोल नव्हतं.

भारतीय क्रिकेट टीम धर्मशाळा येथे मॅच असल्यावर जेथे हमखास येते अशा मॅकॅलॉ रेस्तरॉ मध्ये जेवण केले. संध्याकाळी धर्मशाळा टाउन मध्ये जाऊन पिक्चर बघायचा प्लॅन बनवला. शो सुरु व्हायच्यावेळी कळले कि फक्त ५-६ तिकिटे विकली गेल्याने शो कॅन्सल झाला आहे. खूप वेळ असल्याने धर्मशाळा मार्केट मध्ये निघालो आणि दणकून शॉपिंग झालं. तिकडून परत येताना लोकल टॅक्सी केली. रेस मध्ये भाग घेतल्याच्या आवेशात तो तरुण ड्राइवर अल्टो गाडी चालवत होता. शेवटी जीव मुठीत धरून हॉटेल वर पोचलो.
दुसऱ्या दिवशी धर्मशाळा मॅक्लॉडगंज हुन अमृतसर साठी निघालो. वाटेत ३ ठिकाणे बघायचे ठरले. सर्वप्रथम War Memorial ला पोचलो. युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची आठवण म्हणून सुंदर स्मारक बनवले आहे. आवर्जून भेट द्यावी असे.




त्यानंतर खूप प्रसिद्ध असलेल्या जगातील सर्वात उंचीवरील क्रिकेट स्टेडियम ला पोचलो. सुंदर हिरवळ आणि मागे हिमाच्छादित पर्वतरांगा असे विहंगम दृश्य होते.
पुढच्या वेळी मॅच असताना येऊ असे ठरवून येथून निघालो. त्या नंतर कांग्रा किल्ला बघायला गेलो. (Did you know: Kangra Fort is the largest fort in the Himalayas and probably the oldest fort in India. tourmyindia.com विकिपीडिया) अनेक आक्रमणे आणि भूकंप सोसलेला हा किल्ला, त्याचे अवशेष वरून खाली खणलेले राधा कृष्ण मंदिर (ज्याचा फक्त मागचा भाग आता उभा आहे) हे सर्व बघून, गौरवशाली इतिहासाचा ऐकून गहिवरून आले.


तिकडे ऑडिओ गाईड ची सुविधा उपलब्ध असल्याने authentic आणि detailed इतिहास ऐकायला मिळाला. अशी सुविधा भारतात अनेक ठिकाणी करणे गरजेचे आहे.
त्यानंतर अमृतसर च्या दिशेने निघालो. अमृतसर मध्ये Country Inn हॉटेल मध्ये राहण्याची सोय केली होती.
दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम सुवर्णमंदिर बघायला पोचलो. १ किलोमीटर आधीच पार्किंग करून चालत जावे लागते. येथील सर्व इमारती आणि दुकाने ह्यांचे बांधकाम आणि रंग एकाच पद्धतीने ठेवले आहे. दिसायला छान दिसते.


डोक्याला बांधायचे फडके, बॉर्डर ची टूर, आणि शास्त्री कपड्यांच्या मार्केट ची टूर ह्या गोष्टी विकणारे जवळपास १००० लोकं वारंवार येऊन विचारणा करत होते.
सुवर्णमंदिराला पोचलो. आत जाण्याआधी कुठल्याही प्रकारचे security चेकिंग होत नाही. ह्याने थोडा अचंबा वाटला. आत गेल्यावर समोर पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी सुंदर सुवर्णमंदिर दिसते. पांढरा संगमरवर, शांत पाणी असे एकंदरीत प्रसन्न वातावरण असते. निळ्या रंगाच्या गणवेशात मंदिराचे उंच आणि धष्टपुष्ट रखवालदार फिरत असतात. एका बाजूला पाण्यात डुबकी मारून नमस्कार करणारी लोकं असतात. महिलांसाठी आडोशाला तशी सोय केलेली आहे. १ तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

थोडा वेळ तिथे घालवून नंतर जालियनवाला बाग येथे पोचलो. भारतीय इतिहासातील दुख्खद आणि महत्वपूर्ण घटना. आत जाणारा निमुळता रास्ता. विहीर (ज्यातून १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते), भिंतींवरील गोळ्यांच्या खुणा, सैनिकांच्या आकारात कापलेली झुडुपे बघून बाहेर आलो. तेथे इतिहास वाचला. उधम सिंग (ज्यांनी ह्या हत्याकांडाचा बदला घेतला होता) यांचा पुतळा नावाच्या शेजारीच उभा केला आहे.


तेथून जवळ च brothers आणि धारवान ढाबा अशी २ हॉटेल आहेत. खूप स्वादिष्ट जेवण येथे मिळते. पनीर कुलचा लस्सी छोले


असे छान जेवण करून अटारी -वाघा सीमारेषा आणि change of guards समारोह बघायला निघालो. सरळ रस्ता आहे, १० किलोमीटर वरून च भारताचा झेंडा डौलाने फडकताना दिसतो. पार्किंग ची छान सुविधा येथे केली आहे. एका अर्ध्या स्टेडियम सारखी इमारत बांधली आहे. दुसरीकडे पाकिस्तान बॉर्डर, जिन्ना चा फोटो, पाकिस्तान चा झेंडा दिसतो. BSF चे जवान parade conduct करतात. सगळीकडे देशभक्तीचे वातावरण असते. भारतमाता कि जय, वंदे मातरम आणि जय हिंद ह्या ३ घोषणा सोडून इतर कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. ५ वाजता कार्यक्रम सुरु होतो आणि साधारण ४५ मिनिटे चालतो.




तेथून पुन्हा हॉटेल वर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी Partition museum बघायला निघालो. हे एक सुंदर म्युझियम आहे. फाळणी बद्दल खुप छान माहिती येथे दिली आहे. लोकांचे अनुभव, त्यांच्या वस्तू येथे पाहायला आणि ऐकायला मिळतात. लोकांना आवाहन हि केले जाते कि कोणाच्या कुटुंबात अशा गोष्टी असल्यास त्याची माहिती द्यावी जेणेकरून त्याही येथे मांडल्या जातील.

अमृतसर आणि पंजाब ने फाळणी ची सर्वात जास्त झळ सोसली होती. अमृतसर भारताच्या इतिहासात एक महत्वाचे शहर आहे याची जाणीव होते.

अशा प्रकारे आम्हाला ह्या टूर मध्ये बघायच्या ठिकाणांची लिस्ट संपली होती.


ज्या दिवशी आमची ट्रिप सुरु झाली त्याच दिवशी विंग कमांडर अभिनंदन ची वाघा अटारी सीमेवर पाकिस्तान ने सुटका केली होती. त्यामुळे टूर सुरु होण्याच्या वेळेला तंग वातावरण होते. ट्रिप कॅन्सल कर, जीव महत्वाचा असे सल्ले मिळाले होते. पण अमृतसर ऐवजी चंदिगढ ने बाय रोड जाऊ असा प्लॅन B तयार करून शेवटी जाण्याचे ठरले होते. Actually ट्रिप मध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे tension चा लवलेशही नव्हता आणि पूर्ण ट्रिप शांततेत पार पडली.


~ धन्यवाद
सुयश अभ्यंकर  

No comments:

Post a Comment

History and Politics

इतिहास आणि राजकारण आज अचानक  लिहिण्याचे कारण म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आणि त्यावर केलेला विचार. काही ग...