शांत आणि सुंदर कोकण वर्षासहल (दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर)
बरीच वर्षं, कोकणात जाण्याची इच्छा होती. अलिबाग काशीद मुरुड जंजिरा आणि
लेटेस्ट म्हणजे नागाव बीच अशा जागा पहिल्या होत्या. पण मित्र आणि नातेवाईक परिवार ह्यांच्याकडून
दिवेआगार, श्रीवर्धन, गुहागर, दापोली, वेळणेश्वर अशी नावे
ऐकली होती. अखेर ह्या वर्षी दिवेआगार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर जायचा मुहूर्त निघाला. पुण्यापासून
५-६ तास ड्राईव्ह करून जाणे शक्य असल्यामुळे ह्या जागा निश्चित झाल्या.
Team
BHP वर खूप छान ब्लॉग होते. ते सगळे वाचल्यावरअसं समजलं कि कोकणातल्या ह्या भागात रिसॉर्ट
तशी कमी आहेत. होम स्टे अनेक आहेत. लोकं मुद्दाम commercialization पासून ४
हात लांब आहेत. आणि हि गोष्ट चांगली तशीच वाईटही आहे. अखेर बरंच analysis केल्यानंतर
हरिहरेश्वर चं MTDC
रिसॉर्ट आणि दिवेआगर चं Cocohut
बीच रिसॉर्ट बुक करायचं ठरलं.
अपेक्षेप्रमाणे वेबसाईट convincing न वाटल्यामुळे, गूगल वरून गगनगिरी
टूर्स चा नंबर मिळाला आणि त्यांनी दोन्हीही बुकिंग्स करून दिली.(Gagangiri Tours &
Travels 9892112411/21663028, gagangiritoursntravels@gmail.com)
इकडे रिसॉर्ट चे फार पर्याय उपलब्ध नसल्यामुळे किमतींमध्ये फारशी तफावत नसते. सुमारे
४००० रुपये द्यायची तयारी ठेवावीच लागते. याउलट हरिहरेश्वर चं MTDC खूप स्वस्त
आणि मस्त आहे. Sea
View कॉटेज साठी फक्त २७४४ रुपये मोजावे लागले. ह्या दोन्ही हॉटेल्स
बद्दल अजून माहिती पुढे सांगीनच.
८ जून ला सकाळी ७.३० ला पुण्याहून निघालो. पावसाला सुरुवात होऊन
१-२ दिवसच झाले होते. त्या मुले छान pleasant वातावरण होते. विश्रांतवाडी हुन बाणेर, highway ओलांडून
सरळ जाऊन नांदे,
चांदे हि गावे ओलांडून पुढे पौड गावाला highway ला जॉईन झालो. मुळशी, ताम्हिणी घाटामध्ये
सुंदर वातावरण होते. शुक्रवार सकाळ असल्यामुळे फारशी गर्दी लागली नाही. ताम्हिणी घाटामध्ये
पहिल्यांदाच ड्राईव्ह करत असल्यामुळे काळजीपूर्वक आणि हळू चालवत होतो. ताम्हिणी घाट
संपला कि ऑर्चर्ड हॉटेल नंतर डावीकडे वळलो कि MIDC रोड लागतो. हा दुतर्फा
Industrial एरिया असलेला
छान रास्ता आहे.
त्या पुढे निजामपूर म्हसळा वाटे दिवे आगार येथे पोचलो. अरुंद
रस्त्यांनी आमचे स्वागत केले आणि आम्ही दुपारी १ च्या आसपास कोकोहट रिसॉर्ट ला पोचलो.
रिसॉर्ट तसे छोटे आहे. एका इमारतीमध्ये ३ मजली रिसॉर्ट आणि त्याच्या मध्यभागी छोटासा
swimming
pool. इतर ठिकाणी मिळतं तसं professionalism तुम्हाला
इकडे मिळणार नाही. पण रूम्स छान आहेत. मागे बाल्कनी आहे जिचे दार वाडी मध्ये उघडते.
थोडं फ्रेश होऊन लगेच सुवर्ण गणेश चे दर्शन घेण्यासाठी निघालो.
गावातील छोट्या रस्त्याने चालत आम्ही देवळात पोचलो. देऊळ तसे छान आहे पण आम्ही गेलो तेव्हा निर्जन होते. आत मध्ये CCTV लावले आहेत. (कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे) सोन्याच्या गणपतीचे फोटो लावले आहेत. देवळाच्या समोर वडाचे एक विशाल झाड आहे. Google च्या मदतीने आम्हाला कळले होते कि इकडे आसपास च एक सुंदर मंदिर आहे - Twin टेम्पल्स रुपनारायण आणि सुंदरनारायण.
त्या नंतर त्याच रस्त्याने चालत जाऊन समुद्राच्या दिशेने पहिले डावे वळण घेतल्यावर, दोन वाड्यांमधून एक अरुंद रस्ता आपल्याला इकडे घेऊन जातो. २ सुंदर आणि विशाल मंदिरे दिसतात. पण हि मंदिरे सुद्धा निर्जन होती. मंदिरांच्या आतमध्ये त्याचा इतिहास लिहिला होता. त्या मंदिरामधल्या मूर्तींची पोर्तुगीझांनी चोरी केली होती. पण पुढे त्यांची जहाजे वादळात अडकून त्यांना परत यावे लागले आणि ग्रामवासीयांनी विरोध केल्यामुळे त्या मूर्तींची पुन्हा स्थापना करण्यात अली.

अशा वास्तूंकडे पाहून एक खंत जाणवते ती म्हणजे "We don't know how to
maintain and how to sell." अशी वास्तू युरोपीय देशात असती तर त्यांनी बाजूला कुंपण लावले
असते, आत जायला
तिकीट लावले असते,
इतिहास अभिमानाने सांगितला असता, Audio guide अरेंज केले असते, काही माहितीपट देखील
दाखवले असते. आपण च आपल्या वास्तूंची वाट लावली आहे हेच खरे.
त्याच रस्त्याने पुढे गेलो कि दिवे आगार समुद्रकिनारा दिसतो.
किनाऱ्याला समांतर रस्ता आहे आणि तिकडून किनाऱ्याकडे जायला मधून बरेच मार्ग आहेत. Washrooms आणि changing rooms ही आहेत
पण त्यांना कुलूप लावून बंद ठेवलं आहे.
एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे इकडे खूप restaurants नाहीत.
तुम्हाला होमस्टे मध्ये घरगुती जेवण करायचे असल्यास २ तास आधी फोन करून सांगावे लागते.
जेवणाची वेळ सुद्धा काही ठिकाणी १२-२ एवढीच असते.
दुपारी विश्रांती घेऊन हॉटेल च्या swimming pool मध्ये मनसोक्त डुंबलो.
Pool तसा छोटा
असल्यामुळे नंतर गर्दी झाली आणि आम्ही बाहेर पडलो. संध्याकाळी पुन्हा दिवेआगर बीच कडे
जायचे ठरवले. किनाऱ्यावर मॅगी,भेळ, वडापाव च्या गाड्या
लागतात. त्याच बरोबर वॉटरस्पोर्टस सुद्धा आहेत. All terrain bike चालवण्याची
हौस इकडे पूर्ण करून घेतली.
जवळच्या एका सनी खानावळ मध्ये रात्रीचे जेवायला गेलो. घरगुती
छान जेवण होते. खोबरं घालून केलेली भेंडी ची भाजी नवीन रेसिपी होती.
जेवण चालू असतानाच
तुफान पावसाला सुरुवात झाली. जेवण आटोपून लगेच हॉटेल गाठले.
हॉटेल मध्ये vodafone ची रेंज नसल्यामुळे बाहेर थांबूनच फोन करून घेतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून पुढच्या प्रवासाला निघालो.
दिवेआगार कडून श्रीवर्धन कडे जाणारा किनाऱ्यालगतचा रस्ता म्हणजे अनेक Coastal Roads ना टक्कर
देईल असा आहे. वाटेत अनेक सुंदर जागा लागतात. वाटेत च Pebbles बीच सुद्धा लागतो.
आम्ही एकदम निवांत गाडी चालवत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत पुढे जात होतो. ह्या रस्त्यावर
६ सीटर रिक्षा बऱ्याच दिसतात आणि त्या वेगात धावत असतात.
श्रीवर्धन बीच चं First impression खूप छान
पडतं. किनार्याच्या बाजूला थोडं अंतर ठेवून छान फूटपाथवजा पॅसेज बांधले आहेत. तिकडे
बसायला जागाही केल्या आहेत. बीच वर तसे लोक कमी होते पण सुंदर बीच वर तासंतास बसायलाही
मला आवडले असते.
प्रवासातील पुढचा टप्पा होता हरिहरेश्वर. थोडा detour घेऊन आम्ही
बागमंडला मार्गे हरिहरेश्वर MTDC
resortला पोहोचलो.
आम्हाला ५ नंबर कॉटेज देण्यात आलं होतं. जोरात झालेल्या पावसामुळे स्वागतकक्षात च सांगण्यात आलं कि Lights गेले आहेत. कॉटेज छान बांधली आहेत पण अपेक्षेप्रमाणे देखभाल अत्यंत खराब रीतीने करण्यात येते. हॉटेल चं रेस्टॉरंट सुद्धा so-so. लंच केल्यावर च ठरवलं कि डिनर साठी दुसरं ठिकाण शोधावं लागेल. सुंदर लोकेशन चा कसा फायदा करून घेऊ नये ते mtdc कडून शिकावं. संध्याकाळी हरिहरेश्वर मंदिराकडे जायला निघालो. मंदिराबाहेरील रास्ता इतका निमुळता आहे कि एका वेळी १ च गाडी जाऊ शकते. पार्किंग पासून साधारण २०० पावले चालून गेल्यावर दोन्ही मंदिरे दिसतात.
दर्शन झाल्यावर मंदिराच्या मागच्या बाजूला समुद्राकडे
निघालो. इकडे समोर वाळू आणि किनारा दिसतो तर डावीकडे खडक आणि त्यावर आदळणाऱ्या लाटा.
लाटांच्या तडाख्यामुळे खडकांवर झालेल्या विविध नक्षी बघायला मजा येते. इकडे अंतिम कार्य
करण्याची जागा असल्यामुळे खडकांवर लोकांची नावे लिहिलेली दिसतात.
आम्हाला ५ नंबर कॉटेज देण्यात आलं होतं. जोरात झालेल्या पावसामुळे स्वागतकक्षात च सांगण्यात आलं कि Lights गेले आहेत. कॉटेज छान बांधली आहेत पण अपेक्षेप्रमाणे देखभाल अत्यंत खराब रीतीने करण्यात येते. हॉटेल चं रेस्टॉरंट सुद्धा so-so. लंच केल्यावर च ठरवलं कि डिनर साठी दुसरं ठिकाण शोधावं लागेल. सुंदर लोकेशन चा कसा फायदा करून घेऊ नये ते mtdc कडून शिकावं. संध्याकाळी हरिहरेश्वर मंदिराकडे जायला निघालो. मंदिराबाहेरील रास्ता इतका निमुळता आहे कि एका वेळी १ च गाडी जाऊ शकते. पार्किंग पासून साधारण २०० पावले चालून गेल्यावर दोन्ही मंदिरे दिसतात.
फेसाळत्या लाटा बघताना वेळ कसा जातो समजत नाही. येताना मंदिराच्या
पार्किंग च्या बाजूला असलेल्या उपाहारगृहामध्ये नाश्ता चांगला मिळतो. येताना मुख्य
चौकात असलेल्या कामत मध्ये डिनर करून आम्ही परत आलो. पूर्ण वेळ TV बंद होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी जोरदार पावसाने च जाग आली. ९ वाजताच चेक
आऊट टाईम होता. Restaurant
मध्ये नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागलो. परतीच्या प्रवासात पूर्ण वेळ मुसळधार
पाऊस होता. वळणा वळणा च्या रस्त्यावर हळू जात होतो. मुळशी ताम्हिणी आल्यावर पुण्याकडून
येणाऱ्या दुचाकींची रांग लागली. समोरा समोर टक्कर झालेल्या २ गाड्या देखील दिसल्या.
रस्ता छोटा असल्यामुळे समोरून मोठे वाहन आल्यावर रस्ता सोडून खाली उतरावे लागत होते.
मुळशी च्या कामत कडे खूप गर्दी झाली होती. अनेक Biker groups निघाले होते. येतानाचा
प्रवास खूप मोठा वाटत होता. अखेर ५ वाजता घरी पोचलो.
एकंदरीत छान ट्रिप, शांत कोकण, दमट वातावरण, हिरवागार निसर्ग, फेसाळत्या लाटा
कायम स्मरणात राहतील!